जिल्ह्यातील वकीलांना जिल्ह्यातील विविध न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील वादी

HomeNewsनागपुर डिवीजन

जिल्ह्यातील वकीलांना जिल्ह्यातील विविध न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील वादी

गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे भंडारा) – माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी भंडारा जिल्ह्यातील वकीलांना जिल्ह्यातील विविध न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील वादी प्रतिवादी व अर्जदार गैरअर्जदार यांच्या मधील वाद आपसी समझोत्याद्वारे सोडवून दोन्ही पक्षकारात समेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी कशी करावी, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा च्या वतीने ४० तासांची एकूण ५ दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.

या प्रशिक्षण कार्यशाळेत पवनी न्यायालयाच्या माध्यमातून माझी मध्यस्थी प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती व त्यानुसार मी पाच दिवसांचे ४० तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

त्यानुसार मला मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय राजेश अस्मार यांच्या हस्ते व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री बुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यस्थी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

ॲड. महेंद्र गोस्वामी.

You cannot copy content of this page