प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना; कोरपनातून प्रशासनाला निवेदन, आंदोलनाचा इशारा

HomeNewsनागपुर डिवीजन

प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना; कोरपनातून प्रशासनाला निवेदन, आंदोलनाचा इशारा

गौतम नगरी चौफेर शिला धोटे : प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय व पवित्र दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी लाल बहादुर शास्त्री विद्यालय, गडचांदूर आणी गाडेगाव (विरूर) जिल्हा, परिषद प्रा,शाळा गाडेगाव ता. कोरपना, जि. चंद्रपूर) येथे घडली असून, या प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायी, बौद्ध समाज व संविधानप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावणे, त्यांच्या संदर्भात अवमानकारक शब्दप्रयोग करणे तसेच संविधानावर भाषण करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला मध्येच थांबविण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा पुरका असल्यास तुम्ही घरून फोटो आणुन पुजापाठ करा असाउद्टसह हा प्रकार केवळ एका समाजाचा नसून, संपूर्ण भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांचा अपमान असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ रिपाईसह विविध पक्षाचे कार्यकर्ते व तसेच आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय कोरपना यांच्या मार्फत ( महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदन  देण्यात आले तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर व जिल्हा शिक्षणाधिकारी जि.प. चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून त्यावरच भारतीय लोकशाही उभी आहे.

त्यांच्या अवमाना मुळे लाखो आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक व सरपंच, सचिव दोषींवर तात्काळ कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, काही ग्रामपंचायत व शाळेकडून संविधानिक  मूल्यांचे पालन होईल याबाबत लेखी हमी घ्यावी, भविष्यात अशा घटना घडू नये याकरिता शिक्षण विभागाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात तसेच दोषींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची तात काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना प्रभाकर खाडे, अशोककुमार उमरे, गौतम धोटे, हरीदास गौरकार, रविदास करमनकर, मनोज हस्तक, मेघराज हरबडे, दिनेष झाडे, दिगांबर धोटे, शेषराज शिलारकर, संजय पाटिल, गौतम निमसटकर, सदासिव खिलूरकर, वनिता चंद्रागडे, शिला धोटे, मारोती वानखेडे, अनिल नगराळे, मनोज सातपुते, अरून मालखेडे, गौतम भसारकर, रमेश जिवने, सुनिल फुलझेले, धनराज जिवने  यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

( महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत
निवेदन देण्यात आले )

COMMENTS

You cannot copy content of this page