उद्या आ. सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

HomeNewsनागपुर डिवीजन

उद्या आ. सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

गौतम नगरी चौफेर (प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण  राजुरा) – राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, राजुरा च्या भव्य पटांगणावर दिनांक १० आक्टोंबर २०२४ रोज गुरुवार ला सकाळी ठिक ११ : ३० वाजता भव्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अ. भा. काँग्रेसचे महासचिव मा. खासदार. श्री. मुकुलजी वासनिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. आमदार. श्री. नानाभाऊ पटोले, विशेष अतिथी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार, प्रमुख अतिथी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, प्रमुख पाहुणे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. नानाभाऊ गावंडे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. अभिजित वंजारी, आमदार, शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा. सुधाकर अडवाले यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
      यानिमित्ताने होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, NSUI तथा काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन तालुका राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी च्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS