गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.३० सप्टेंबर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यापीठस्तरीय मेरिट यादीत ॲड. यादवराव धोटे स्मृती महाविद्यालय, राजुरा येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यापीठाच्या मेरिट यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तिन्ही मानाची स्थाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशामध्ये प्रथम विद्यापीठ मेरिट मिळविण्याचा मान कु. पायल दुर्वास नगराळे(८.७१ ) हिने मिळविला. द्वितीय विद्यापीठ मेरिट कु. पायल देवराव ठाकरे (८.१९ )हिने, तर तृतीय विद्यापीठ मेरिट कु. पूजा दिनकर बोधे (८.१८ )हिने प्राप्त केले.
विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे व सचिव डॉ. अर्पित धोटे व इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकवृंद यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

