(गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा/साकोली) – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी आज दिनांक 11 नोव्हेंबर 2026 ला दुपारी 12 वाजता देशोन्नतीचे साकोली तालुका प्रतिनिधी , एशिएन न्यूज चैनल चे मुख्य संपादक व महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त डी .जी. रंगारी यांच्या निवासिनी भेट घेतली. डी .जी. रंगारी यांचा मागील पंधरा दिवसापूर्वी अज्ञात टू व्हीलर वाहने धडक दिल्याने त जागीच पडून जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या छातीला, पायाला, खांद्याच्या भागाला दुखापत झाल्याने ते मागील पंधरा दिवसापासून घरीच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बेड रेस्ट घेत आहेत. पत्रकार रंगारी यांना दुखापत झाल्यामुळे पत्रकार क्षेत्रातील बऱ्याच बातम्या, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सध्या बंद आहेत. त्यांचा अशा प्रकारे अपघात झाल्याने समाजाच्या प्रश्नाची जडणघडण व आपल्या मीडियाच्या माध्यमातून ते न्याय सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत होते .परंतु अशा प्रकारे त्यांचा अपघात झाल्याने समाजाची सुद्धा एक प्रकारे हानी झालेली आहे .ते अपघातातून लवकरात लवकर दुरुस्त व्हावे अशी मनोकामना पत्रकार क्षेत्रातील , सामाजिक , व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केलेली आहे.

