नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेद्वारे एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

HomeNewsनागपुर डिवीजन

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेद्वारे एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

– गडचांदूर व राजुरा येथे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ
गौतम नगरी चौफेर राजुरा, दि. १२ जुलै

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने १ ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य पात्र प्रवाशांसाठी एनसीएमसी (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या पुढाकारातून राजुरा व गडचांदूर येथे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
राजुरा येथील माता मंदिर तसेच गडचांदूर येथील कन्यका माता मंदिर येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली. गडचांदूर येथे आयोजित शिबिरात सुमारे ११० महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी करून शिबिराचा लाभ घेतला. तर राजुरा येथेही शेकडो लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे महत्त्व, आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया तसेच कार्डच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना पुढील प्रक्रियेची माहितीही देण्यात आली.

यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाच्या डिजिटल सेवांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना वेळेत स्मार्ट कार्ड उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, मनोज कोल्हापुरे, सुनैना तांबेकर, रवी बुटले, अरुणा सालवटकर, किरण अहिरकर, सोनम येवले, सीमा वरारकर, संध्या वाघाडे, मनिषा काळे, श्रीरंग ढोबळे, शंकर बुऱ्हाण, अभय बोबाटे, किरण हेडाऊ, डॉ. चंद्रकांत कुईटे, सुनील रामटेके, स्वतंत्रकुमार शुक्ला, अरुणा बुटले, मेघा धोटे, बबिता कांबळे आदींसह गडचांदूर, राजुरा टीम च्या पदाधिकारी सदस्य संघटक यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे शालिक मधुकर भगत यांचे सहकार्य लाभले. शिबिरामुळे अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना घराजवळच एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली असून, या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

You cannot copy content of this page