तुमसर नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या गाडीला घेराव;

HomeNewsनागपुर डिवीजन

तुमसर नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या गाडीला घेराव;

नगराध्यक्ष सागर गभणे यांची मध्यस्थी अपयशी.श्रीकृष्ण एस.देशभ्रतार

गौतम नगरी चौफेर”
भंडारा :-
तुमसर नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ तब्बल ६० सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले. मागील दहा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी संघर्षाची भूमिका स्वीकारली. दोन महिन्यांपासून वेतन रखडणे, किमान वेतनाचा लाभ न मिळणे आणि सफाईसारखे अत्यंत जोखमीचे काम करतानाही आवश्यक सुरक्षासाहित्य उपलब्ध करून न देणे, या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला थेट जबाबदार धरत आंदोलन अधिक तीव्र केले आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्राचा आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाला दिवसभर विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, नगरसेवक गुलराज कुंदवानी, रोशनी भोंडेकर, रेखा चकोले, नगरपरिषद उपाध्यक्ष सचिन,देवचंद ठाकरे, मेहताबसिंग ठाकूर, योगेश सिंघनजुडे, अमरीश सानेकर आणि शैलेश पडोळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

(तुमसर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या गाडीला घेराव.

  • कचऱ्याच्या ढिगांनी शहराचा श्वास गुदमरला!.. •आमरण उपोषणाची ठिणगी, कंत्राटी सफाई कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव…

You cannot copy content of this page