खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोलिच्या अध्यक्षांकडे मागणी
गौतम नागरी चौफेर (चंद्रपूर) : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या विविध कोळसा खाण क्षेत्रात गेलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन आणि वेकोलि कर्मचाऱ्यांच्या । प्रलंबित मागण्यांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांची नागपूर येथे की पडली. या बैठकीत खा. प्रतिभा वेकोलिचे अध्यक्ष तथा सहप्रबंधक संचालकांसोबत बैठक पार धानोरकर यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली.
या बैठकीत खा.प्रतिभा धानोरकर यांनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या वणी क्षेत्रातील दरम्यान गाडेगांव, विरुर, खैरगाव, उकणी, बेलोरा, वणी नॉर्थ क्षेत्र तसेच कोलार पिंपरी, घोन्सा आणि बल्लारपूर क्षेत्रातील गौरी तसेच माजरी व एकोणा परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने लावून धरला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलि प्रकल्पांतर्गत अद्यापही पूर्णपणे संपादित झालेल्या नाहीत. या शिल्लक राहिलेल्या जमिनी तातडीने संपादित करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलिने आधीच संपादित केल्या आहेत. परंतु, त्यांच्या कुटुंबातील आश्रितांना अद्यापही नियमानुसार नोकरी देण्यात आलेली नाही. अशा सर्व पात्र उमेदवारांना तातडीने वेकोलीमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी लावून धरली. यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलिने संपादित केल्या आहेत. परंतु, ५ वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही काही घरगुती किंवा कौटुंबिक कारणास्तव त्यांच्या आश्रितांना नोकरी लागू शकली नाही, अशा विशेष प्रकरणांमध्ये प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना नोकरी मिळविण्यासाठी एकदा पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी खा.प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच, रात्रंदिवस वेकोलिमध्ये राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे त्यांनी वेकोली व्यवस्थापनाला सांगितले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीनंतर, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या प्रशासनाने चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित समस्यांवर अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.


