अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून बॉम्बेझरी येथे जाळी  वॉलकंपाऊंड व प्रवेश गेट चे भूमिपूजन.

HomeNewsनागपुर डिवीजन

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून बॉम्बेझरी येथे जाळी  वॉलकंपाऊंड व प्रवेश गेट चे भूमिपूजन.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी गडचांदूर) – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सी.एस.आर. कामांत नेहमी पुढची वाटचाल करत आहेत.
हि वाटचाल करताना नुकताच त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बॉम्बेझारी येथे मोकळ्या असलेल्या शालेय पटांगणाला जाळीचे वॉलकंपाऊंड व प्रवेश गेट बांधकामाचे भूमिपूजन आज ग्रामपंचायत सरपंच मनीषा पेंदोर यांच्या हस्ते नारळ फोडून व कुदळ मारून करण्यात आलेत. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग, विध्यार्थी, माणिकगड सी.एस. आर पथक व बॉम्बेझरी गांवातील नागरिक उपस्थित होते. या कार्यामुळे शाळेतील विध्यार्थ्यांना सुरक्षा मिळेल व त्यांच्याकरिता खेळण्यासाठी एक मोठे पटांगण तयार होईल असे प्रतिपादन शिक्षक व नागरिकांनी  कलेत तर सरपंच यांनी माणिकगड चे मनापासून आभार व्यक्त केलेत.

COMMENTS