कोरपना येथे तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या उपस्थित ०१आॉगस्ट पासून महसूल सप्ताहाला सुरुवात.

HomeNewsनागपुर डिवीजन

कोरपना येथे तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या उपस्थित ०१आॉगस्ट पासून महसूल सप्ताहाला सुरुवात.

गौतम नगरी चौफेर कोरपना :-  दरवर्षीप्रमाणे दिनांक ०१ ऑगस्ट हा दिवस “महसूल दिन” म्हणुन साजरा केला जातो.  राजुरा उपविभागात दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “महसूल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येत आहे.

   आज एक आगस्टला “महसूल दिन व सप्ताह शुभारंभ पल्लवी आखरे तहसीलदार कोरपना यांचे उपस्थितीत तहसील कार्यालय कोरपना, येथील सभागृहात महसूल दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. “महसूल विभागाचे विविध संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र विरतण समारंभ आयोजित केले.

२ आगस्ट रोजी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणे, उपविभागीय कार्यालय स्तरावर तहसिलदार, राजुरा, कोरपना, जिवती, उप अधिक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत यांचे सोबत  उपविभागीय अधिकारी, राजुरा यांचे अध्यक्षतेखाली पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटपासंदर्भातील आढावा बैठक, ३ आगस्ट सकाळी १०.०० वाजता, गावामध्ये पांदन रस्ता व दुर्तफा झाडे लावणे.

४ ऑगस्टला मंडळ गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे

५ ऑगस्टला सर्व गाव  येथे विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेशन न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी भेटी देवून आधार व्हॅलिडेशन व आधार मॅपिंग करण्याबाबत सुचना देऊन पंचनामा करण्यात येणार आहे.

६ ऑगस्टला तालुक्यात शासकीय जमिनींवरील अतिक्रमण व शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत तक्रारी प्राप्त असल्यास त्या निकाली काढून अतिक्रमणे निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

७ ऑगस्ट “M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नविन मानक कार्यप्रणालीप्रमाणे एस.ओ.पी. प्रमाणे धोरण पुर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभाचे आयोजन केले असल्याचे तहसीलदार कोरपना पल्लवी आखरे यांनी सांगितले.

COMMENTS

You cannot copy content of this page