नवनिर्मित सुलभ शौचालय गेटवरच ठेवली “पानटपरी”

HomeNewsनागपुर डिवीजन

नवनिर्मित सुलभ शौचालय गेटवरच ठेवली “पानटपरी”

साकोली नगरपरिषदेची तातडीने कारवाई ; पानठेला जेसीबीने उचलून जप्त

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – म्हणतात ना, कोणतेही सुंदर काम या साकोलीत करा पण काही ना काही त्यास घाण करण्याची सवय जात नाही. नगरपरिषद झाल्यापासून तब्बल ०९ वर्षानंतर एका स्थानिक सोशल मिडीयाच्या लिहीलेल्या शब्दांवर मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी शहरात दोन सुलभ शौचालये उभे केले. त्यातच आता याला खराब करण्याचा प्रयत्न केला गेला. तर जागृत जनतेच्या तक्रारीवर गेटवरच उभारलेला पानठेला तात्काळ नगरपरिषदेने ( मंगळ. १९ ऑगस्ट ) ला जेसीबी लावून उचलून जप्त करण्यात आला.
           सन २०१६ पासून नगरपरिषद अस्तित्वात आली. परंतू येथील कुणीच शहरात महामार्गावर सुलभ शौचालय काय तर साधे मुत्रीघर बांधू शकले नाही. त्यात “साकोली मिडीया” या व्हॉट्सॲप समुहाने वारंवार जनजागृती करून संपूर्ण सोशल मीडियातून “बिना संडासाचे खेडेगाव, जनतेस शौचास लागली तर लोटा बॉटल धरा आणि तलाव पकडा” या सडेतोड शब्दरचनांची चक्क मालिका सुरू केली. येथील तीन मुख्याधिकारी बदलून गेले त्यांच्याही लक्षात हा प्रकार आला नाही. पण येथील मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचे या कटू शब्दांच्या बातम्यांवर लक्ष गेले आणि आठवडी बाजारात एक व नागझिरा रोडवर एक असे दोन सुसज्ज सुलभ शौचालये अखेर शहरात तयार करून दाखविले. कारण या बिना संडासाचे सर्वात जुने इंग्रजकालिन तहसिल शहर साकोलीची गावोगावी बदनामी झाली होती. आता या सुलभ शौचालयासमोरील गेटवरच अतिक्रमण करणाऱ्या पानटपरीची काही जागरूक सोशल मिडिया मित्रांनी तक्रार केली. यातच मंगळवार ता. १९ ऑगस्टला स. ११:२५ दरम्यान एक्शन कारवाईचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचे आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी गुंजन फेंडर, स्वच्छता पाणीपुरवठा अभियंता इंजि. संतोष दोंतूलवार यांची चमु नागझिरा रोडवर धडकली आणि जेसीबी लावून तो गेटसमोरच उभारण्यात आलेला पानठेला तात्काळ उचलून जप्त करण्यात आला. या धडक कारवाईचे परीसरातील जनतेने नगरपरिषदेचे आभार मानले आहे. तर चांगल्या आणि या स्वच्छतेच्या कामात तेथील परीसर गलिच्छ करू नका अशी प्रतिक्रिया उपस्थित जनतेने व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया 

“कितीतरी वर्षांनी तर पहिल्यांदाच आपल्या शहरात एका जागृत सीओंनी लक्ष वेधून दोन दोन सुलभ शौचालये निर्माण झाली. नाही तर बाहेरचे पाहुणे येथे येऊन “फ्रेश” व्हायला सुलभ शौचालय विचारत होते. पण इतरत्र शोधून शोधून नाईलाजाने ते हसून जात होते याने किती आपल्या साकोली शहराची बदनामी झाली असेल. आता या जागी असे गलिच्छ कामे करू नये. यात कुणाच्या गोरगरीबाच्या रोजगार गेला असेल त्यांना आम्ही रोजगाराची जागा उपलब्ध करून देऊ. पण या कारवाईचे आम्ही स्वागतच करतो”

आशिष चेडगे -“साकोली सोशल मिडीया संचालक”

COMMENTS

You cannot copy content of this page