संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी

HomeNewsनागपुर डिवीजन

संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी

गौतम नगरी चौफेर /कोरपना – श्री. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज बहुउद्देशीय समाज मंडळ, नांदाफाटा यांच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास जयंती भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलाताई नवले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच परिषद मुंबईचे जिल्हा समन्वयक तथा बिबी येथील उपसरपंच आशिष देरकर, माजी सभापती संजय मुसळे, नांदा येथील सरपंच मेघा पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, अभय मुनोत, पुरुषोत्तम निब्रड, पोलिस पाटील वैशाली भोयर उपस्थित होते.
        संत रविदास महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांवर मान्यवरांनी प्रकाश टाकला. त्यांच्या शिकवणुकीचा अवलंब करून समाजात एकात्मता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य शंकेश लिपटे, अरविंद इंगोले, प्रकाश शिवणकर, मोरेश्वर वाराडकर, मनोज भोयर, पारस वाढई, रामभाऊ धुळे, वासुदेव पंचवटे, कवडू टिकले, संतोष वाढई आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला असून, उपस्थितांनी संत रविदास महाराजांच्या विचारांना अनुसरून सामाजिक एकता आणि बंधुभाव जोपासण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव गोकुल बनसोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष सतीश लांडे यांनी केले.

COMMENTS