– एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य
– ओबीसी सेवा संघ,युथ फार सोशल जस्टिस इतर विविध संघटनेचा सहभाग.
गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार भंडारा :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती युवा संघटना द्वारा भंडारा जिल्हा कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन शासकीय निकम्य सरकारच्या विरोध दर्शवत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये अनुसूचित जाती व बौद्धांच्या निधी समाज कल्याण द्वारा ४१०.३० कोटीच्या लाडकी बहिणी योजनेत वळवला त्यामुळे पूर्ववत निधी द्यावा. अनुसूचित जाती-जमातींना क्रिमिलियर न लावणे या बाबद संसदेत घटनात्मक ठराव मंजूर करून अट रद्द करावी, अनुसुचित जाती व अनुसुचीत जन जाती महाराष्ट्र उप वर्गीकरण समिती बरखास्त करावी, भटक्या जमातीसाठी घरकुल योजनेतयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत नवीन वसाहत न घेण्याचा निर्णय या योजनेत नवीन घरकुल देणे सुरू ठेवण्यात यावी.जेणेकरून राज्य पुरस्कृत योजना सुरू राहतील, १४००० जिल्हा परिषद नगर परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा,ओबीसी प्रवर्गातील मुलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेचा लाभ देण्यासाठी ६०% गुणाची अट रद्द करुन सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात, यावा, महाराष्ट्र विद्युत महामंडळातील सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर स्थापण्याची शक्ती निरस्त करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात यावे. असे विविध मागण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागृती सेवा संघानी एक दिवशी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन एकलव्य सेना, महाराष्ट्र राज्य ओबीसी सेवा संघ, युथ फार सोशल जस्टीस संघटना. ज्येष्ठ नेते अचल मेश्राम, सामाजिक युवा नेता दीपक जनबंधू, सामाजिक कार्यकर्ता सुजित चव्हाण. यांनी सहभाग घेत जिल्ह्यातील हजारौ कार्यकर्ते व संघटनेनी सहभाग घेतला.



COMMENTS