गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत एकोडी अंतर्गत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिनाच औचित्य साधून गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्या नंतर महाराष्ट्र गीत सादर करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी सरपंच संजय खोब्रागडे, उपसरपंच रिगण राऊत,ग्रामपंचायत अधिकारी गौतम खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, वैभव खोब्रागडे, कुंदा जांभुळकर, आशा बडवाईक, रहिला कोचे, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप चौधरी, अमित भैसारे, शेषराज मेश्राम, पुरणदास निपाने, रघु बन्सोड उपस्थित होते


COMMENTS