स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

आवारपूर गौतम धोटे : गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘अभ्यास कौशल्य व वेळ व्यवस्थापन’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते. विशेष मार्गदर्शक म्हणून नरसिंग पाचाळ सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाची पद्धत, मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास यावर प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. प्रदीप परसुटकर व प्रा. आशिष देरकर यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. संगीता पुरी व प्रा. चेतना येरणे यांनी केले होते. कार्यक्रमाला अकरावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page