पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्या वतीने 41, महिला, पुरुष व युवकांनी केली नेत्र तपासणी
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक व जनता टाईम/ जटा टीवी चे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या 9 जून 2025 ला वाढदिवसानिमित्त सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार येथे नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्या वतीने मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार खुशाल बोपचे, होते .प्रमुख म्हणून जनता टाईम/ जटा टीवी चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे, संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर ,शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधि बौद्ध, प्राध्यापक राजेश नंदपुरे ,साहित्यिक अमृत बनसोड. दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत ,कार्यकारी संपादक संजय दांडगे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.यात 41 महिला, पुरुष ,युवकांनी सहभाग नोंदवून मोफत नेत्र तपासणी चा लाभ घेतला. सर्व लाभार्थ्यांना डोळ्यात घालण्याचे ड्रॉप सुद्धा देण्यात आले. यात प्रामुख्याने पंकज वानखेडे, विलास बांडेबुचे ,कुलदीप गंधे ,संदीप नरुले ,सुमित डिघोरे ,आदेश भुजाडे, विजय डहाट ,सुभाष भानारकर ,नितेश थुलकर ,आशिष मेश्राम ,बुद्धपाल भंते ,अमित शिवणकर ,अर्पित मेश्राम, संदीप राऊत ,विनय ढोके ,लोकेश धुळसे ,लोकनाथ रायपुरे , भांबोरे,राहुल गणवीर, अभय रंगारी, प्रमोद वासनिक,प्रदीप लोखंडे ,सतीश सोमकुवर ,निकेतन वानखेडे ,सुरज गोंडाने,अमरकंथ समरीत,करुणा मेश्राम ,मंजुषा लाडे,लता भांबोरे ,प्रेमसागर गजभिये , प्राध्यापक,राजेश नंदपुरे ,गुलाब घोडसे ,जीवन बोधी बौद्ध ,
भारत कराडे, दर्शन कोसरे ,सुमित खोपे ,सिद्धार्थ भालेराव ,दुर्गेश लोंदासे, अंकित लोंदासे ,प्रेमसागर गजभिये, प्रेम मारवाडे,मनोज गजभिये यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

COMMENTS