दिपक भवर यांचे इतिहास अभ्यास मंडळावर माजी विद्यार्थी म्हणून तीन वर्षांसाठी नेमणूक

HomeNewsनागपुर डिवीजन

दिपक भवर यांचे इतिहास अभ्यास मंडळावर माजी विद्यार्थी म्हणून तीन वर्षांसाठी नेमणूक

– स्वायत्त महाविद्यालय कलमाअंतर्गत यूजीसी अधिसूचना एप्रिल २०२३, १२.३(६).

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा २१ सप्टेंबर
                   प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गणेशखिंड पुणे ४११०१६ (स्वायत्त) हे २०२२ पासून स्वायत्त महाविद्यालय म्हणून कार्यरत आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अलीकडील ट्रेंड आणि कौशल्य संचांचा विचार करून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्यात इतिहास विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनवणारा आणि उद्योजकीय विकासावर लक्ष केंद्रित करणारा कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन स्वायत्तता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत अभ्यासक्रमाची रचना आणि समीक्षा करण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी इतिहास अभ्यास मंडळावर माजी विद्यार्थी म्हणून दिपक भवर यांचे नामांकन करण्यात आले आहे. दिपक भवर हे इतिहास विषयातील पदव्युत्तर पदवी धारक आहे. यांच्याकडे असलेले कौशल्य आणि उद्योगातील समृद्ध अनुभव याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असे मत प्राचार्य, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲन्ड कॉमर्स गणेशखिंड पुणे (अभिमत विद्यापीठ ) यांनी व्यक्त केले. दिपक भवर हे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांनी गड किल्ले संवर्धन, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, महिला हिंसा प्रतिबंधक समितीवर कार्य केले आहे.  इतिहास अभ्यास मंडळावरील माजी विद्यार्थी म्हणून तीन वर्षांसाठी नामांकनाने नियुक्तीचे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, महासचिव आशिया रीजवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महिला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS

You cannot copy content of this page