आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे गोकुळाष्ठामी निमित्त दहीहंडी कार्यक्रम <br>विविध कार्यक्रमानी विद्यार्थांनी केली गोकुळाष्ठामी साजरी

HomeNewsनागपुर डिवीजन

आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे गोकुळाष्ठामी निमित्त दहीहंडी कार्यक्रम
विविध कार्यक्रमानी विद्यार्थांनी केली गोकुळाष्ठामी साजरी

गौतम नगरी चौफेर (बादल बेले) – बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था चनाखा (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळकाला व दहीहंडी चे आयोजन करण्यात आले याप्रसंगी गट साधन केंद्र राजूरा च्या विषयतज्ज्ञ ज्योती गुरनुले मॅडम अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दिपक सातपुते, पालक प्रतिनिधी विशाल दवंडेजी, सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, सोनल नक्षीने, दिपक मडावी, सुवर्णा कोटरगे, सविता गेडेकर, नेहा तळवेकर प्रामुख्याने उपस्थित होते बालवाडी व वर्ग 1 ते 5 च्या विद्यार्थांनी राधाकृष्णाची वेशभूषा केली व नृत्य सादर केले बंडू बोढे, दिपक मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली चिताथरारक मनोरे रचून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थांनी कृष्णकथा वाचन, कृष्ण सुदामा मित्रता, विविध कृष्णवर आधारित गीतांवर नृत्य सादर केले. बालगोपालांनी गोपाळकाला व दहीहंडीचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक बंडू बोढे यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक सातपुते यांनी व आभार शिक्षक बंडू बोढे यांनी मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page