शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिर 1 नोव्हेंबर सुरू

HomeNewsनागपुर डिवीजन

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिर 1 नोव्हेंबर सुरू

पत्रकार संजीव भांबोरे यांनी धम्मचारी व धम्मचारीणी यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन केली चर्चा

गौतम नगरी चौफेर (भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र भंडारा धम्म वर्ग पवनी अंतर्गत ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिराचे आयोजन 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत करण्यात आले असून ध्यानसाधना व व्यक्तिमत्व शिबिराला पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील धम्मचारी विमलरत्न नागपूर यांच्याशी धम्म साधना व व्यक्तिमत्व विकास शिबिर काय आहे यावर चर्चा केली. धम्मचारीणी अमोघ श्री चंद्रपूर यांनी मेघीय सूक्त याबद्दल माहिती दिली. अमृतवजरी धम्मचारीणी पुलगाव यांनी पंचधर्मेंद्रिय श्रद्धा काय आहे याबद्दल माहिती दिली. धम्मचारी पुण्यधर पुलगाव यांनी गटचर्चा काय असते याबद्दल सदर प्रतिनिधीशी चर्चा करण्यात आली. या शिबिरात विदर्भातील 50 शिबिर शिबिरार्थी यांनी भाग घेतला असून त्यांची जेवण्याची, राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भगवान बुद्धाचा धम्म सुखाने जीवन जगण्याची कला आहे. आपल्याजवळ कितीही पैसा, धन, संपत्ती, पदप्रतिष्ठा सत्ता असली तरी बुद्धाच्या मते आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून सुखी जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून दरवर्षी धम्मवर्ग पवनीच्या वतीने धम्म शिबिराचे आयोजन केले आहे.

COMMENTS