२१ वर्षांची परंपरा! ‘विक्रमवीर’ आमदाराला वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट: कोरपण्यात एकाच दिवशी १३९४ विक्रमी रक्तदान!

HomeNewsनागपुर डिवीजन

२१ वर्षांची परंपरा! ‘विक्रमवीर’ आमदाराला वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट: कोरपण्यात एकाच दिवशी १३९४ विक्रमी रक्तदान!

राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त महाशिबिराचे आयोजन; तालुक्यात प्रथमच रक्तदानाचे उच्चांक!

गौतम नगरी चौफेर //संपादक// लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा वस्तुपाठ आपल्या समाजकार्यातून घालून देणारे चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महाशिबिराला कोरपना तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक नवा इतिहास घडवला आहे. आमदार भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देवरावदादा मित्रपरिवार’ यांच्या वतीने कोरपना तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १३९४ नागरिकांनी रक्तदान करून एक विक्रमी नोंद केली आहे.

आमदार देवराव भोंगळे यांची रक्तदान शिबिराची ही परंपरा तब्बल २१ वर्षांपासून अखंड सुरू आहे. राजकीय पदापेक्षा सामाजिक बांधिलकीला महत्त्व देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे, त्यांनी यंदा आमदार झाल्यानंतरही आपल्या वाढदिवसाचा उत्सव भव्य समारंभात न करता, जीवनदान देणाऱ्या या महायज्ञात करण्याचे निश्चित केले. त्यानुसार, संपूर्ण राजुरा विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात कोरपना तालुक्याचा सहभाग लक्षणीय ठरला.

आठ केंद्रांवर रक्तदात्यांची अलोट गर्दी तालुक्यातील आठ ठिकाणी हे शिबिर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडले. विशेषतः तरुण रक्तदात्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. प्रत्येक केंद्रावर शिस्तबद्ध पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले.
पारडी १०१, कोरपना २५८, वनसडी १०७
नारंडा १७५, बिबी १५३, नांदा फाटा २२५
कवठाळा २६२, गडचांदूर ११३,एकूण १३९४ या आठ गावातील केंद्रावर युवकांची अलोट गर्दी होती. तालुक्यात प्रथमच एकाच दिवशी १३९४ युनिट रक्त संकलित करण्याचा अनोखा विक्रम झाल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. या रक्तदानातून रुग्णालयांना होणारा रक्तपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
(चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत एकूण २६ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबीरांमध्ये ५३०२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवल्याने आरोग्य सेवेतील रक्ताची निकड पूर्ण करण्यास मोठा हातभार लागणार असून नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.)
उत्स्फूर्त प्रतिसादाने पार पडलेले हे शिबिर सामाजिक बांधिलकी आणि जनसेवा या मूल्यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

तुमच्या प्रेमाचा उतराई होणे अशक्य! – आमदार देवराव भोंगळे

या विक्रमी महारक्तदानाच्या यशस्वी आयोजनानंतर ठिकठिकाणी आभारपर बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासारखे पुण्यकर्म करून राष्ट्रसेवेत योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मी सर्वप्रथम विशेष आभार मानतो. तुमच्या या प्रेमामुळेच मागील २१ वर्षांपासून राष्ट्रसेवेचा हा उपक्रम सातत्याने यशस्वी होत आहे. तुमच्या प्रेमाचा आणि दिलेल्या योगदानाची उतराई होणे अशक्य आहे. आज चंद्रपूर जिल्हा व परीसरात  एकुण २६ ठिकाणी हे महारक्तदान शिबीरे पार पडत आहेत. प्रचंड मोठ्या संख्येने रक्तदानासाठी रक्तदात्यांची गर्दी दिसत आहे, आजचा महारक्तदानाच्या संकल्पाचा हा दिवस सामाजिक बांधिलकीचा आणि ऐक्याचा उत्सव ठरत आहे; त्यासाठी योगदान देणार्‍या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहील.

पुढे बोलताना, मी आयोजक मित्रपरिवाराच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो. जेव्हा माणसाचे आयुष्य संकटात असते, तेव्हा त्याला पैशाची नाही, तर रक्ताची गरज असते. रक्त हे कोणत्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, ते विकत सुद्धा घेता येत नाही; ते केवळ तुमच्या आणि माझ्यासारख्या संवेदनशील माणसांच्या शरीरातूनच मिळू शकते. तुमचा एक बाॅटल रक्त भविष्यात एका लहान मुलाचे, एका अपघातग्रस्ताचे, एका प्रसूतीसाठी संघर्ष करणाऱ्या मातेचे प्राण वाचवू शकते; हे समाधानच खरंतर अवर्णनीय आहे, असेही ते म्हणाले.

COMMENTS

You cannot copy content of this page