💥अपक्ष उमेदवार चिन्हांच्या शोधात💥
गौतम नगरी चौफेर //शिला धोटे गडचांदूर : गडचांदूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यासाठी समाज माध्यमातून प्रचारावर चांगलाच भर दिला जात आहे.
येत्या २ डिसेंबरला नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी नागभीड नगरपरिषदेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. छाननीनंतर नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदतही संपुष्टात आली. या निवडणुकीत राजकीय पक्षांसह नगराध्यक्ष पदासाठी १० तर नगरसेवकपदासाठी ८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावित आहे. यात काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन स्थिर झाल्यापासून आपआपल्या प्रभागात प्रचाराला सुरूवात केली. तांत्रिक युगात प्रचाराचे स्वरुप बदलले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भ्रमणध्वनीचा जास्त वापर होत आहे. या तांत्रिक युगात सर्वांच्या हातात स्मार्ट फोन आल्याने कुठे काय सुरु आहे, हे
सहजरित्या कळते. शहरातील व्यक्ती कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियाला जोडला गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार सोशल मिडीयावर आपल्या प्रचाराची पोस्ट व रिल बनवून मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे नामांकन स्थिर झाल्यापासून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. येत्या २६ नोव्हेंबरला अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप होणार आहे. चिन्ह नसले तरी मतदारांच्या घरी भेट देत, मी निवडणुकीत उभा आहे. माझ्याकडे लक्ष असू द्या, असे सांगत आहेत. २६ नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप होत असून, प्रचाराला केवळ चार दिवस मिळणार आहेत. अपक्ष उमेदवारांना मतदारांच्या घरभेटीवर जास्त भर देऊन आपले चिन्ह पोहोचविण्यास चांगली तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळणार आहे. नागभीड नगरपालिकेत कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार व कोणते सदस्य निवडून येणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.



COMMENTS