शेतकऱ्यांचे धानाचे शिल्लक चुकारे या संबंधात माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे व सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी पंकज काकडे चर्चेचा पत्रकार संजीव भांबोरे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट

HomeNewsनागपुर डिवीजन

शेतकऱ्यांचे धानाचे शिल्लक चुकारे या संबंधात माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे व सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी पंकज काकडे चर्चेचा पत्रकार संजीव भांबोरे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट

धानाची शिल्लक असलेली रक्कम आज पासून देण्यास सुरुवात होणार!

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ला सहाय्यक पणन अधिकारी पंकज काकडे  यांच्यासोबत जे शेतकऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे  धान्याचे चुकारे बाकी होते तर ते मिळण्या संबंधात माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा पत्रकार संजीव भांबोरे यांनी ग्राउंड रिपोर्ट घेतला. चर्चेअंती त्यांनी सांगितलं की ,आमच्याकडे पैसे जमा आहेत पण तांत्रिक अडचणीमुळे ते पैसे जमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकले नाही .पण दिनांक 26 नोव्हेंबर पासून आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास सुरू केलेली आहे. व  दोन-तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील अशा प्रकारची आश्वासन सहाय्यक पंकज काकडे यांनी दिलेला आहे .आणि सोबतच ज्या शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे बॅलन्स होते. जे ब्लॅक लिस्टमध्ये आहेत तर त्या संबंधात सुद्धा शासनाशी पाठपुरावा सुरू आहे. आणि ते सुद्धा ह्या दोन-चार दिवसांमध्ये पैसे येतील अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी दिले. त्यासोबत आपल्या जिल्ह्यामध्ये आता मक्याचा फार मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झालेली आहे आणि तो मका सुद्धा शासनाने खरेदी केंद्रावर विकत घ्यावा अशा प्रकारची त्यांना आम्ही मागणी केली  मागणीनुसार त्यांनी सांगितलं की, जर शेतकऱ्यांची तशी मागणी असेल तर या उन्हाळ्यामध्ये आम्ही खरेदी केंद्राच्या मार्फत मका सुद्धा खरेदी करू अशा प्रकारचा आश्वासन सहाय्यक डीएमएस भंडारा यांनी दिलेला आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page