लाखांदूर येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य धम्म संमेलन कार्यक्रम  संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

लाखांदूर येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य धम्म संमेलन कार्यक्रम  संपन्न

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – लाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती च्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य धम्म रॅलीचे आयोजन त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथून सुरू करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शी सम्राट अशोक परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण पिंपळगाव रोड लाखांदूर येथे आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमानिमित्त बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत विनाचार्य, लोब सांग तेनपा, भंते चित्त ज्योती स्थवीर, भदंत महामोगलायन थेरोसावंगी, भंते शीरभद्र चीचाळ, भदंत चारुदत्त ओपारा, भदंत कुणाल कीर्ती, यांचे नेतृत्वात धम्म रॅलीचे आयोजन करण्यात  आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.अशोक वानखेडे वरिष्ठ पत्रकार दिल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदरणीय सुषमाताई अंधारे सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत मुंबई उपस्थित उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून अँड शैलेश नारनवरे कायदे सल्लागार महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नागपूर, विशेष अतिथी म्हणून अँड स्मिताताई कांबळे नागपूर उपस्थित उपस्थित होत्या. प्रामुख्याने सायंकाळी ७ वाजता संगीतमय प्रबोधन फैजानभाई ताज  सुप्रसिद्ध भीम कव्वाल नागपूर यांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन दिनेश वासनिक उद्योजक सोनी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. दिवेश कांबळे प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी उपस्थित होते. उपाध्यक्ष अनिल दहिवले उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव, कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज बनसोड यांनी केले. यावेळी लाखांदूर तालुक्यातील व जिल्ह्यातील बौद्ध बांधव उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page