– सावित्रीच्या लेकींचा दणका
– त्या महिलेचा माफीनामा
गौतम नगरी चौफेर राहुल हंडोरे कल्याण दि. 27 जुलै : कल्याण पूर्वेतील लोकग्राम विभागातील सौ. प्रतिमा द्विवेदी या महिलेने इंस्टाग्रामवर एस सी /एस टी समाजाच्या विरोधात पोस्ट टाकली होती. या पोस्ट मध्ये म्हटले होते की, “विकसित भारतकी राह मे दो कलंक एस सी /एस टी और आरक्षण. मेरा संकल्प इनका अंत ” अशी पोस्ट प्रसिद्ध होताच कल्याण पूर्वेतील सावित्रीच्या लेकींनी आवाज उठवला व कोळशेवाडी कल्याण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करणाऱ्या सावित्रीच्या लेकी सौ भावना सुरळके, कुसुम गौतम (गेडाम) सौ शिला सोरटे, आरती बागुल, प्रिया वारडे आदि. महिलांनी पोलिसात मागणी केली की, अनुसूचित जाती जमाती मध्ये असंतोष पसरविणाऱ्या महिले विरुद्ध ऍट्रॉ्सिटी कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.


तेव्हा सौ प्रतिमा द्विवेदी या महिलेने कोळसेवाडी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक महोदया समोर महिलांची सावित्रीच्या लेकींची जाहीर माफी मागितली. गयावया करत एस सी /एस टी समाजा ची माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नाही असा माफीनामा पोलिसांना लिहून दिला.
