नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.

गौतम नगरी चौफेर बादल राजुरा, दि.१० ऑगस्ट
ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. “कार्यक्रमाच्या प्रारंभी रविवार, दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या महान आदिवासी नेते व स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रदूत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.”
यावेळी बी. के. स्मिता दीदी यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीबाबत मार्गदर्शन करत अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्यास प्रवृत्त केले. व्यसनाचे आरोग्य, कुटुंब व भविष्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत निरोगी व व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थितांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वर्षा पोडे होत्या. प्रमुख अतिथी डॉ. शमा बोढे,मोनिका मून व रूपाली वरवाडे उपस्थित होत्या. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार व पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.धनंजय डवरे यांनी केले.
“नशेला नकार देऊया, जीवनाला होकार देऊया!” या संदेशातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

You cannot copy content of this page