टेला मेरिस स्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

HomeNewsनागपुर डिवीजन

टेला मेरिस स्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.११ ऑगस्ट स्टेला मेरिस काॅन्वेंट स्कूल बामनवाडा येथील खेळाडूंनी चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटना चंद्रपूर च्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपुर येथे घेण्यात आलेल्या १४, १६, १८ व २० वर्षांखालील मुला, मुलींच्या मैदानी स्पर्धेत भाग घेतला व घवघवीत यश संपादन केले.
१४ वर्षांखालील वयोगटात ट्रायथलॉन (६० मी , लांब उडी, उंच उडी) मध्ये ओम पिंपळकर प्रथम, रूद्र कोडापे द्वितीय. १६ वर्षांखालील वयोगटात गोळा फेक व भाला फेक मध्ये कु. रियल रामटेके प्रथम, कु. सृष्टी गिरमाजी द्वितीय, ६०० मी. धावने मध्ये सुजल खिरवटकर द्वितीय, पेन्टालाॅंन काव्यांशू गौरकार द्वितीय क्रमांक पटकावला हे सर्व खेळाडू, डेरवन, जि. रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख शिक्षक भास्कर फरकाडे व क्रीडा शिक्षिका कु. नेहा श्रीवास्तव यांचे मार्गदर्शन मिळाले. खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाॅयल डि एम, सि. सजिवा डि एम, सि. लुशी डि एम, तेरेसा डि एम, चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष दिलीप जैस्वाल, सचिव सुरेश अडपेवार , तालुका क्रीडा संयोजक हरिश्चंद्र विरूटकर, किशोर चिंचोलकर, बादल बेले, पुर्वा खेरकर, संगिता बांबोळे, वर्षा कोयचाळे शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडूंचे पालक आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page