जिवती वनपरिक्षेत्रात सागवान तस्करीचा पर्दाफाश;

HomeNewsनागपुर डिवीजन

जिवती वनपरिक्षेत्रात सागवान तस्करीचा पर्दाफाश;

पिकअप वाहनासह ६.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी ताब्यात
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि.९ ऑगस्ट अवैधरित्या सागवान झाडाची लाकडे वाहतूक करणाऱ्या 4 आरोपीसह पिकअप आणि सागवान लाकडे असा 6लाख 21 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आली ही कारवाई 9 आगस्ट रोजी जिवती वनपरिक्षेत्र वनकर्मचार्यानी केली आहे. जिवती वनपरिक्षेत्रात्तील सोरेकसा ते शेनगाव मार्गावर सागवान लाकडाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून सापळा रचला. संशयित पिकअप वाहनाचा मागोवा घेत शेनगाव परिसरात तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान सागवाण लाकूड पिकअप वाहनाच्या सहाय्याने वाहतूक करून परिसरात लट्ट्यांचा साठा केल्याचे निदर्शनास आले. रात्रोच्या गस्ती दरम्यान अडवण्यात आलेल्या पिकअप वाहनात सागवाण तस्करीच्या खुणा व वाहतुकीचे अवशेष आढळून आल्याने वाहन जप्त करण्यात आले. तसेच सागवाण लाकडाचे लठ्ठेही जप्त करण्यात आले.या कारवाईत 1लाख 21 हजार रुपये किमतीचे सागवाण लाकूड व 5 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण अंदाजे 6 लाख 21हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वनविभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून काही आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. तस्करीमागील मोठ्या रॅकेटचा शोध घेण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे. मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये तसेच उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांच्या नेतृत्वात
क्षेत्र सहायक एस. एम. सलामे , एस. व्ही. सावसागडे , एन. आर. चापले ए.एम.गेडाम ,वनरक्षक अनिल गोरकर, अविनाश राठोड, सय्यद, एम. ई. मोरे, पी. एच. कोवे, आर. सी. टेकाम (वनरक्षक) व इतर वनकर्मचारी यांनी समन्वयाने साखळी रचून ही कारवाई यशस्वी केली. वन विभागाकडून अवैध वृक्षतोड, सागवाण तस्करी व अवैध वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभाग सतर्क असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

You cannot copy content of this page