गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा- शहरातील संत तुकाराम सभागृह (बावणे कुणबी समाज) पोलीस स्टेशनच्या मागे भंडारा शहरात 26 नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की, 26 जानेवारी 19 50 ला स्वतंत्र भारताची स्वतंत्र राज्यघटना आपल्या देशात लागू करण्यात आली. त्याला 26 नोव्हेंबर 2025 ला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 26 नोव्हेंबर 2025 ला भारतीय राज्यघटना व नागरिकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय शेंडे लेखक व संविधान अभ्यासक नागपूर, प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कोराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, प्रमुख अतिथी माझी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे उपस्थित होते सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले, भारताचे संविधान, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारताचे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

विक्रम यशस्वी करण्याकरता विष्णुदास जगनाडे, डॉ बाळकृष्ण सार्वे, गोपाल सेलोकर, वामनराव गोंधुळे, संजय मोहतुरे, इंजिनियर त्र्यंबकराव घरडे, सदानंद इलमे, ओबीसी सेवा संघ, जनगणना परिषद, ओबीसी जागृती संघ, ओबीसी क्रांती मोर्चा युथ फार सोशल जस्टीस भंडारा, संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित होता.



COMMENTS