बावनकुळे साहेब, शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का?

HomeNewsनागपुर डिवीजन

बावनकुळे साहेब, शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का?

गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – बावनकुळे साहेब, तुम्ही शेत रस्ता आणि शेत मोजणी बाबत विधानसभेत जे ऐलान केले,विधेयक मांडले ते तर आम्हाला आवडले.पण ते अमलात आणले नाही.हे आम्हाला आवडले नाही.
    जामनेर तालुक्यातील माळ पिंपरी येथील सुरेश पंडित शिंगोटे यांचे शेत गट नंबर मोजणी साठी डिसेंबर २०२२ पासून अर्ज केला आहे.मोजणी फी भरली आहे.तरीही हे तुमचे अधिन भुमि अभिलेख अधिकारी काम करीत नाहीत.
     याबाबत मी स्वतः तुमचे पीए , ओएसडी यांचेशी बोललो. विस्तृत पत्र दिले.तरीही नाही.काय कारण आहे?
    मंत्रीच्या अधिन अधिकारी असतात कि अधिकाऱ्यांच्या अधिन मंत्री असतात.तुमची कोणती नस अधिकाऱ्यांच्या पायाखाली दाबली गेली आहे.
    या विषयावर मी स्वतः संबंधित शेतकऱ्यांना घेऊन मंत्री गिरीश महाजन यांना भेटलो.त्या भाऊंनी हो हो म्हटले पण या कामाकडे लक्ष दिले नाही.हे तर संकट मोचक आहेत.आणि त्यांच्याच मतदाराचे संकट निवारण करू शकत नाही.हे चुकीचे नाही का?
   आपण जर शेतकऱ्यांशी प्रामाणिक असाल तर ताबडतोब जामनेर भुमि अभीलेख उप अधिक्षक लेकुरवाळे यांना फोन केला पाहिजे.विचारले पाहिजे.
१)तीन वर्षांत शेत मोजणी का केली नाही?
२)शेतकऱ्यांचा नकाशा कोणी बनवला?कोणी  चुकवला?
३)नकाशा शेतकरी बनवतो कि कार्यालयात बनतो?
४)जर नकाशा चुकीचा आहे असे कारण सांगितले तर तसे शेतकऱ्यांना लेखी का दिले नाही?
    साहेब, नकाशा मी पाहिला.चुकीचा नाही.हे नोकर शेतकऱ्यांकडून पैसा येण्याची वाट पाहातात.जो पैसा देईल त्यांच्यासाठी काम करतात.
   यामुळेच शेत रस्ता आणि शेत मोजणी प्रलंबित केली जाते.लांच मिळवण्यासाठी ही अडवणूक केली जात आहे.
    बावनकुळे साहेब आम्ही स्थानिक आमदार,संकट मोचक आणि महसूल मंत्री पर्यंत तक्रार करूनही काम होत नसेल तर तुमचे सरकार शेतकरी विरोधात काम करीत आहे का? शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास मजबूर करीत आहे का?

…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

COMMENTS

You cannot copy content of this page