भद्रावती नगरपरीषद सुस्त! शहरातील खड्डे पडले मस्त!! मात्र नागरिकांचे मरण झाले स्वस्त….

HomeNewsनागपुर डिवीजन

भद्रावती नगरपरीषद सुस्त! शहरातील खड्डे पडले मस्त!! मात्र नागरिकांचे मरण झाले स्वस्त….

नागरिकांनी श्रमदानाने बुजवले रस्त्यावरील खड्डे. नगर परिषदेचा केला निषेध.

गौतम नगरी चौफेर // भद्रावती तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर भद्रावती : नगरपरिषद सुस्त शहरातील खड्डे पडले मस्त  नागरिकांचे मरण झाले स्वस्त भद्रावती शहरातील एकही रोड सुरक्षित नसुन खड्डेमय शहर झाले आहे. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात या खड्यामध्ये पाणी साचुन रस्त्यातील खड्डे दिसत नाही. पाददळ व गाडी चालविणात्यांना तारेवरची कसरत करावी लागते एखाद्या पत्रकारांनी बातमी प्रकाशित केली कि थातुर मातुर  खड्डे बुजून मलमपट्टी करण्याचे काम नेहमीच भद्रावती नगरपरिषद करीत असतात भद्रावती शहरातील व परीसरातील श्रद्धास्थान असलेल्या गणेश मंदिर या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी गणेश मंदिर परिसरातील नागरिकांनी भद्रावती नगर परिषदेला अनेक अनेकदा निवेदने देऊन या खड्ड्यांच्या तक्रारी केल्या. तरी पण केबिनमध्ये थंड हवेत बसुन कारभार चालवीणाऱ्या भद्रावती नगरपरिषद प्रशासनाला  जाग आली नाही. या समस्येकडे कायम दुर्लक्ष केले. शेवटी निराश झालेल्या नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करीत स्वतःच श्रमदान करीत गणेश मंदिर परिसरातील फेरीलँड शाळेजवळील रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.या रस्त्यावर कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडलेले होते. या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अनेक किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले. व अपघाताचे हे सत्र सुरूच होते. याबाबत नगरपरिषदेला नागरिकांतर्फे निवेदने देऊन खड्डे बुजवण्याची विनंती करण्यात आली मात्र केवळ आश्वासना पलीकडे येथील नागरिकांना काहीच मिळाले नाही. शेवटी सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे व शंकर घोटेकर यांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन श्रमदान करीत हे खड्डे बुजविले व स्वतःच ही गंभीर  समस्या मार्गी लावली.

COMMENTS

You cannot copy content of this page