गौतम नगरी चौफेर – गडचांदूर, २७ जून – प्रहार संघटनेच्या प्रयत्नाने गडचांदूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी चव्हाण यांच्याशी भेट घेऊन दिव्यांगांसाठी विशेष निधी वाटप करण्यासाठी निवेदन व चर्चा करण्यात आली गेल्या टीम महिन्या पासून रखडलेला दिव्यांग बांधवांचा राखीव 5% निधी तत्काळ वाटप करावा या साठी प्रहार संघटनेने दिव्यांग बांधाव यांना घेऊन नगर परिषद येथे धडक देत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा निघाला नगरपरिषदेच्या वार्षिक उत्पन्नातून पाच टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी निश्चित करावा, अशी मागणी केली होती. या मागणीला आता प्राधान्य देत निधी वाटपाचा संकल्प केला होता
हा निधी दिव्यांग बांधवांच्या विविध गरजा पूर्ण करण्यात मदतीला येईल. त्यामुळे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुलभ होईल. गडचांदूर परिसरातील दिव्यांगांच्या हितासाठी हा निधी महत्त्वाचा ठरेल. नगरपरिषदेच्या या सकारात्मक पावल्यामुळे स्थानिक समाजामध्ये आशा नवी ऊर्जा निर्माण झाली. या कार्यक्रमाला राजुरा विधानसभेच्या आमदार देवराव भोंगळे मुख्याधिकारी नगरपरिषद गड तालुका चव्हाण प्रहार जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर कोरपना तालुका प्रमुख विनोद शिंदे, सतिश शेरे, प्रफुल देवलकर, अनुप राखुंडे, दिनेश राठोड, महादेव बेरड, निलेश मुरमुरबार, नितीन सपकाळ, सूरज बार, सरोज मडावी, वाजीद, अमित कनोजिया, राकेश शेंद्रे, पवन येणगुंटीवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना संविधान भेट देऊन डीबीटी पद्धतीने सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यात पाच टक्के निधी रक्कम जमा करण्यात आली यात प्रहार चे बिडकर यांनी आमदार देवराव भोंगळे यांना दिव्यांगासाठी दिव्यांग भवन मंजूर करून दिव्यांगाना उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.


COMMENTS