26 नोव्हेंबर ला भंडारा येथील संत तुकाराम सभागृहात संविधान दिन अमृत महोत्सवाचे आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

26 नोव्हेंबर ला भंडारा येथील संत तुकाराम सभागृहात संविधान दिन अमृत महोत्सवाचे आयोजन

गौतम नगरी चौफेर  संजीव भांबोरे भंडारा – शहरातील संत तुकाराम सभागृह (बावणे कुणबी समाज) पोलीस स्टेशनच्या मागे भंडारा येथे 26 नोव्हेंबर 2025  रोज बुधवार ला दुपारी 1  वाजता संविधान दिन अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सविस्तर वृत्त असे की, 26 जानेवारी 19 50 ला स्वतंत्र भारताची स्वतंत्र राज्यघटना आपल्या देशात लागू करण्यात आली. त्याला 26 जानेवारी 2025 ला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 26 नोव्हेंबर 2025 ला भारतीय राज्यघटना व नागरिकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय शेंडे लेखक व संविधान अभ्यासक नागपूर, प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कोराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. करिता या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संविधान शाखा यशोदा नगर भंडारा, शाखाप्रमुख विष्णुदास जगनाडे, डॉ बाळकृष्ण सार्वे, गोपाल सेलोकर, वामनराव गोंधुळे, संजय मोहतुरे, इंजिनियर त्र्यंबकराव घरडे, सदानंद इलमे, ओबीसी सेवा संघ, जनगणना परिषद , ओबीसी जागृती संघ , ओबीसी क्रांती मोर्चा युथ फार सोशल जस्टीस भंडारा ,संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा यांनी केलेले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page