– उल्लेखनीय समाजसेवेसाठी सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड प्रदान.
गौतम नगरी चौफेर (हर्षवर्धन देशभ्रतार “भंडारा) :- केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली – महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संविधान दिन, जागतिक मानवाधिकार दिन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे भव्य संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाअंतर्गत संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षा – २०२५ मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानपत्र व भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरव करण्यात आला. राज्यातून मृणाली गणेश रामटेके व त्रिशा राजेंद्र कातोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर अर्थ सुभाष नागदेवे व चांदनी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच शिवांग मौर्या, रमानी रंगारी, प्राची मरसकोल्हे, खुशबू बोरकर, सोनाक्षी निकुले, मयंक कावळे, रोहिणी पडोळे, पियुष खेत्रे, फालगुनी पात्रे, श्रेया मरखडे या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या उपक्रमात राज्यातील सदर उपक्रमात गांधी जुनियर कॉलेज कोंढा, वैनगंगा हायस्कूल पवनी, नगरपरिषद ज्युनिअर कॉलेज पवनी, OASIS इंटरनॅशनल स्कूल बेला, कॅटलायझर इन्स्टिट्यूट भंडारा, नानाजी जोशी विद्यालय शहापूर, खात विद्यालय खात, लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय तुमसर, महाराष्ट्र हायस्कूल सीहोरा, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल ठाणा, जिल्हा परिषद हायस्कूल शिहोरा, महिला समाज विद्यालय भंडारा, जकातदार जुनिअर कॉलेज भंडारा, संत शिवराम विद्यालय भंडारा, भारती कन्या हायस्कूल तुमसर, शारदा हायस्कूल तुमसर, नेहरू हायस्कूल तुमसर, भागीरथा भास्कर हायस्कूल भंडारा, ग्रामविकास हायस्कूल कोंढी, नगरपरिषद गांधी विद्यालय भंडारा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी ज्युनियर कॉलेज मोहदुरा, सावित्रीबाई फुले विद्यालय बेला, पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा, नेहरू विद्यालय तुमसर व विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. संविधान व मानवाधिकार विषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
यावेळी समाजात निर्भीडपणे व सातत्याने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय गौरव आयकॉन अवॉर्ड – २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये भिक्षुनी संघप्रिया महाथेरी, प्रविण भोंदे, सोमदेव चोपकर, सोपान रंगारी, श्रीकृष्ण देशभ्रतार, उत्तम मेश्राम, भाऊ कातोरे, मंगेश हुमणे व शिलानंद नंदागवळी यांचा समावेश होता.

केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून मरणोपरांत देहदानाबाबत जनजागृतीचे कार्य सातत्याने सुरू आहे. या अनुषंगाने संघटनेच्या पदाधिकारी सौ. मालाताई समुद्रेकर यांनी मरणोपरांत देहदानाची घोषणा करून रीतसर प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यापूर्वी नागरतन रंगारी व प्रदीप घाडगे यांनीही मरणोपरांत देहदान केले आहे. या कार्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी हे सातत्याने जनजागृती करत आहेत.
कार्यक्रमास केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा सरकारी वकील ॲड. विनोद भोले, भंडारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन रहांगडाले, कार्यकारी अभियंता व्ही. एस. चुरहे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाचे महत्त्व, मानवाधिकारांचे संरक्षण व समाजहितासाठी कार्य करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवानंद नंदागवळी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शीलवंतकुमार मडामे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

COMMENTS