गौतम नगरी चौफेर (गडचांदूर ) – प्रहार जनशक्ती पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऍडव्होकेट अरविंद वाघमारे गडचांदूर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असून या निवडणूक चिन्ह वाटपाची तारीख 26/11/2025 आहे. त्या तारखेच्या अगोदर कोणत्याही उमेदवारांना पोस्टर बॅनर लावन्याची परवानगी संविधानानुसार राहत नाही. परंतु निवडणूक अधिकारी असतांना भर चौकात सगळ्याच राष्ट्रीय पक्षांनी आपापली बॅनर लावून आपला प्रचार सगळ्यांना चिन्हे वाटण्या अगोदर चालू केला आहे. घराघरात जाऊन स्वतःच्या उमेदवाराचे फोटो पक्षाच्या चिन्हा सोबत कॅलेण्डर वाटत आहे. भोंग्याची परवानगी न घेता भोगे फिरवत आहे . निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे तक्रार पूर्ण पुराव्यासहित दिली असता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्ही परवानगीची पाहणी करून कारवाई करू मात्र पुरावे दाखल केल्यावर आचारसंहितेचा भंग झाला हे लक्षात येताना सुद्धा कारवाई होताना दिसत नाही मी असे समजतो की ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची हत्या आहे. संविधानानुसार प्रत्येक उमेदवाराला समान संधी दिली आहे. परंतु नगर परिषद गडचांदूर निवडणुकीत असे होतांना दिसत नाही. जर आम्हाला समान संधी मिळत नसेल तर मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ऍडव्होकेट अरविंद वाघमारे या निवडणूक प्रक्रियेचा बहिष्कार जाहीर करत आहे. मी या निवडणुकीत स्वतःचा प्रचार करणार नाही, एकही बॅनर, एकही लाऊड स्पीकर लावणार नाही. मी बाबासाहेबांना मानणारा त्यांच्या आदर्शवार चालणारा आहे. मी जनतेवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही. निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या अन्याया विरोधात मी आज जाहीर बहिष्कार करत आहे.




COMMENTS