माती उत्खनन कंपनीग्रस्त गावांना रिपब्लिकन पक्ष पदाधिकारी आणि अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्षाची भेट.

HomeNewsनागपुर डिवीजन

माती उत्खनन कंपनीग्रस्त गावांना रिपब्लिकन पक्ष पदाधिकारी आणि अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्षाची भेट.

गौतम नगरी चौफेर  //अशोककुमार उमरे // KVR Contraction p.l. माती उत्खलन कंपनी दुर्गापूर चंद्रपूर या कंपनीत स्थानिकांना  रोजगारात प्राधान्य देण्याबाबत ४ नोव्हेंबर २०२५ ला रिपब्लिकन पार्टी आणि अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने विनंती अर्ज देण्यात आला होता.

देण्यात आलेल्या विनंती अर्जावर कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे गुरूवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ ला कंपनीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कोमल रामटेके, रिपब्लिकन सेनेचे इंजी तथागत पेटकर, कोषाध्यक्ष गुरूदास रामटेके, वाहन चालक कामगार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर गोखरे, आकाश ताकसांडे इत्यादींनी कंपनी व्यवस्थापकांना भेट घेण्यासाठी गेले असता तिथे कोणताही जबाबदार व्यवस्थापक किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर नव्हते. मात्र उपरोक्त कंपनीत परप्रांतीय कामगारांच्या वतीने कंपनीच्या माध्यमातून माती उत्खननाचे काम धुमधडाक्यात सुरू होते.

कंपनीचे स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या बाबत उदासीन आणि बेजबाबदार धोरणावर तोडगा काढण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने माती उत्खनन कंपनीग्रस्त गावांना भेट देण्याच्या उद्देशाने गुरूवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ ला या कंपनी परिसरातील ग्रामपंचायत वरवट सरपंचा मा. कुमारी सुमित्रा रायपूरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक खोब्रागडे, ग्राम पंचायत सदस्या सौ. खोब्रागडेताई आणि स्थानिक बेरोजगार युवक व गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

यांत उपस्थित गावकऱ्यांनी रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ दुपारी ०२ : ०० स्थळ- वरवट येथे या परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन कंपनीच्या धोरणाबाबत साधकबाधक चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याचे ठरविण्यात आले.

सदर प्रसंगी वरवट येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक खोब्रागडे यांना बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे संविधान आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेल्या प्रकटपत्राचे पुस्तक भेट देण्यात आले.

COMMENTS

You cannot copy content of this page