आदर्श शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्य विद्यार्थ्यांच्या वेशभूषा स्पर्धा संपन्न.

HomeNewsचंद्रपूर

आदर्श शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्य विद्यार्थ्यांच्या वेशभूषा स्पर्धा संपन्न.

– स्काऊट गाईड्स, कब बुलबुल व राष्ट्रीय हरित सेना विभागातर्फे “खरी कमाई” उपक्रमाचे आयोजन.

गौतम नगरी चौफेर सौ सुवर्णा बादल बेले राजुरा – ३ जानेवारी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षक, थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश धोटे, अध्यक्ष, बा.शी.प्र.मं. यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर, संचालिका अल्का सदावर्ते, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख वसुंधरा मित्र बादल बेले, महिला पालक प्रतिनिधी बाकेवार, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी समाजसेवक, क्रांतिकारक, राजकीय नेते तसेच समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तसेच स्काउट्स गाईड्स, कब बुलबुल, राष्ट्रीय हरित सेना इको क्लब च्या वतीने “खरी कमाई” हा उपक्रम घेण्यात आला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान, पदार्थांची माहिती, देवाणघेवाण कौशल्य, नाणे नोटा ओळख, चवीची माहिती, सहकार्यवृत्ती, धीटपणा, स्वच्छता आदींविषयी माहिती मिळावी तसेच स्वतःच्या परिश्रमाने केलेली कमाई याबद्दल आत्मियता निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल्स लावले होते. या उपक्रमातील काही निधी भारत स्काउट्स गाईड्स कार्यालय चंद्रपूर येथे देण्यात येणार आहे. स्काऊट लीडर रूपेश चिडे, गाईड्स कॅप्टन रोशनी कांबळे, कब बुलबुल युनिट च्या अर्चना मारोटकर, सुनिता कोरडे यांनी खरी कमाई उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वेदांती भोंगळे व रागिणी भंडरवार यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन परी वाघे हिने केले.

COMMENTS

You cannot copy content of this page