खातेरा पैनगंगा नदीपात्रात बुडून एका विवाहित महिलेची आत्महत्या

HomeNewsनागपुर डिवीजन

खातेरा पैनगंगा नदीपात्रात बुडून एका विवाहित महिलेची आत्महत्या

•आत्महत्यांचे कारण अस्पष्ट,परिसरात विविध चर्चेंना उधाण

गौतम नगरी चौफेर  //संघर्ष  भगत  // झरी तालुक्यातील खातेरा गावातील एका विवाहित महिलेने नदीपात्रात जाऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. तिचे माहेरचे नाव समीक्षा जगन्नाथ डोके मुक्काम खातेरा व सासरचे नाव सौ.समीक्षा कौस्तुभ खडसे गाव दुर्गाडी ता.कोरपना जिल्हा. चंद्रपूर वय वर्षे 25 असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे सद्या घरकुला साठी नदीपात्रात रेतीचे वाटप सुरू आहे. लोकांची त्या ठिकाणी भिड होती व अश्यातच काही प्रशासकीय अधिकारी सुद्धा घाटावर उपस्थित होते.परंतु समीक्षा ने खूप आरडा ओरड केली पणं ही बाब कुणाच्याच लक्षात न आल्यामुळे तिच्या मदतीला कोणीच धावून जाऊ शकले नाही. अश्यातच तिने तिचा जीव गमावावा लागला. पुढील तपास मुकुटबन पोलिस करत आहे. तिच्या मागे मुलगा, पती, सासू, सासरे असा आप्त परिवार आहे. विशेष म्हणजे मुलगा केवळ दोन वर्षाचा आहे. आता त्याची आई या जगातून कायमची निघुन गेल्याने पूर्ण दुःखाच वातावरण परिसरात निर्माण झालं आहे. मात्र माहेर गावची समीक्षा गेल्याने परिसरात व डोके आणि खडसे परिवारावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page