जिवती तालुका नवनिर्वाचित आमदार – देवराव भोंगळे आभार दौरा

HomeNewsनागपुर डिवीजन

जिवती तालुका नवनिर्वाचित आमदार – देवराव भोंगळे आभार दौरा

गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण. जिवती) – दि. २८ -11-2024 जिवती तालुक्यातील नगराळा, देवलागुडा, धोंडाअर्जुनी, पालडोह, टेकामांडवा व हिमायतनगर या गावांना भेटी देऊन नागरिकांचे जाहीर आभार मानले.
प्रसंगीच जिवती शहरात कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी जंगी स्वागत केले; त्यांच्या स्नेहपुर्वक स्वागताचा ही कृतज्ञतापूर्वक स्विकार केला.

जिवती तालुक्याने भाजप व मित्रपक्ष महायुतीवर विश्वास ठेवून मला मताधिक्य दिलं. तुम्ही दाखविलेल्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. जिवती सारख्या दुर्गम भागात विकासाची गती वाढेल यासाठी मी येत्या काळात संपुर्ण शक्तीनिशी काम करणार आहे. असा विश्वास आभार मनोगतातून व्यक्त केला.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह महायुतीतील सर्वच घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते, माझे हितचिंतक, मित्र, कुटुंबीय सर्वच जण मनापासून निःस्वार्थपणे राबले. या सर्वांशिवाय आजचा विजय अशक्य होता. माझ्या विजयासाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येकाला हा विजय समर्पित आहे. असेही यावेळी आवर्जून सांगितले.

या दौऱ्यात माझ्यासमवेत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, प्रल्हाद मदने, गोविंद टोकरे, शहराध्यक्ष राजेश राठोड, तुकाराम वारलवाड, साहेबराव राठोड, विठ्ठल चव्हाण, अंबादास कंचकटले, प्रेम परखड, पुष्पा सोयाम, पुष्पा पट्टेवाले, सुरेश रागीट, अरूण डोहे, अजय राठोड, सचिन बल्की यांचेसह मोठ्या संख्यने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी उपस्थिती होती.

COMMENTS