राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन यांना निवेदन सादर
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – नागपूर जिल्ह्यातील नाग नदीचे दूषित पाणी हे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येऊन मिळत असल्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी दूषित होते. त्यामुळे अनेक समस्यांना भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना सामना करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातून जे नाग नदीचे दूषित पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येऊन मिळते त्या पाण्यामध्ये कारखान्याचा कचरा, शहरातील घाण, मूत्र, प्लास्टिक मिश्रित असतो. त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कारण वैनगंगा नदीतील पाणी हे नळ योजनेद्वारे नागरिकांना दिल्या जाते. त्यामुळे पोटाचे आजार, त्वचेचे आजार, कावीळ यासारखे रोग होतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. गंभीर आजार त्यामुळे होतात. त्याचप्रमाणे हे पाणी शेती करता वापरल्या जाते. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतो यामुळे शेतीची गुणवत्ता कमी होते.
नागपूर जिल्ह्यातील नाग नदीचे पाणी आहे हे नागपूर जिल्ह्यातीलच वीज प्रकल्पाकरिता किंवा कारखान्याकरिता त्या पाण्याचा वापर करण्यात यावा व नागरिकांना या दूषित पाण्यापासून मुक्त करावे अशी मागणी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी महामाईम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णण यांना एका लेखी दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे .यावेळी माजी खासदार सुनील मेंढे ,माजी खासदार मधुकर कुकडे ,माजी आमदार सेवक वाघाये, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष जिभकाटे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
COMMENTS