महाराष्ट्र स्टेट सिलांबम ( लाठी काठी) चॅम्पियनशिप* थाटात संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

महाराष्ट्र स्टेट सिलांबम ( लाठी काठी) चॅम्पियनशिप* थाटात संपन्न

यवतमाळ जिल्हा प्रथम चंद्रपूर जिल्हा द्वितीय नागपुर जिल्हा तृतीय पारितोषिक व  ट्रॉफी विजेते

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात व विदर्भ विभाग मधे शहर व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय सिलांबम (लाठी काठी) चॅम्पियन निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व तांत्रीक सहकार्य करण्याचे आश्वासन सिलांबम स्पोर्टस असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मास्टर संजय बनसोडे ( इंटरनॅशनल एक्स्पर्ट रेफरी व कोच, पुणे) यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय सिलांबम स्पर्धा उद्घघाटक म्हणुन बोलतांना व्यक्त केले आहे.

खेलो इंडिया भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त सिलांबम ( लाठी काठी, तलवार,भाला, इत्यादी भारतीय पारंपारिक शस्त्र स्पर्धा क्रीडा प्रकारांचा आपल्या विदर्भ विभाग मधे नियोजित विकास व प्रसार करण्याच्या एकमात्र उद्देशाने सिलांबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन
च्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाराष्ट्र स्टेट सिलांबम चॅम्पयनशिप दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2024 ला भद्रावती येथे करण्यात आले होते. या स्पर्धा चे मुख्य आयोजन मास्टर दुर्गराज एन रामटेके ( विदर्भ विभाग प्रमुख – सिलांबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) यांनी केले होते .

यावेळी मंचावर कार्यक्रम च्या अध्यक्ष म्हणुन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुर सिलांबम असोसिएशन च्या संस्थापक व अध्यक्ष सौ. शितल दुर्गराज रामटेके, प्रमुख पाहुणे म्हणून श्री हनुमान लाठी आखाडा वणी चे अध्यक्ष श्री सुरेश रायपुरे, इंटरनॅशनल रेफरी स्मिता धिवर, अमरावती विभाग प्रमुख मास्टर प्रीतम सोनावणे, चंद्रपूर जिल्हा सचिव मास्टर बी एल करमनकर, चंद्रपूर जिल्हा कोच प्रवीण पाथरर्ड, अक्षय चवरे, अमीन शेख, जगतार सिंग (नागपुर), जनार्दन कुसराम(गोंदिया), अभिजित पारगावकर, रमेश भगत (वर्धा), किरण बोबाटे(सातारा), प्रदीप ओव्हाळ (मुंबई), राजु गव्हाणे, रामराव राठोड(यवतमाळ), दर्शन रोकडे (वाशिम), विजय राठोड (अकोला)
इत्यादी यावेळी मंचावर उपस्थित होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रम डॉ राहुल साळवे, भाऊराव मेश्राम,अजय पाटील नुरसिंह व्यायाम शाळा वणी चे पुरुषोत्तम अक्केवार, बाबाराव उगले, विठ्ठल चौधरी, अनिल पिंपळकर, श्री हनुमान लाठी आखाडा वणी चे श्याम रामटेके, भाऊराव उंदिरवांडे, गणेश रायपुरे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धा च्यां यशस्वी आयोजनासाठी चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य करण डोंगरे, संजय माटे, लक्ष्मण घुगरे, सॅम मानकर, संदीप पंधरे, क्रिश भोस्कर, पांडुरंग भोयर, सिनु रामटेके, सुरज मेश्राम, यश सोरते, संगीता तावांडे, रजनी बावणे, शंभु वाघमारे, इत्यादीनी कठीण प्रयास केला आहे.

COMMENTS