ईव्हीएम मशीन मध्ये घोळ झाल्यामुळे भंडारा नगरपरिषद 2025 ची झालेली निवडणूक रद्द करून नव्याने बायलट पेपर द्वारे घ्या- विविध राजकीय पक्ष्यांची मागणी

HomeNewsनागपुर डिवीजन

ईव्हीएम मशीन मध्ये घोळ झाल्यामुळे भंडारा नगरपरिषद 2025 ची झालेली निवडणूक रद्द करून नव्याने बायलट पेपर द्वारे घ्या- विविध राजकीय पक्ष्यांची मागणी

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्य राज्य निवडणूक आयुक्त, राज्यपाल यांना निवेदन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – भंडारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य उमेदवाराचे अपूर्ण निकाल प्रदर्शित झालेले आहे. त्यात सौ करुणा ऋषी राऊत( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार) पक्षाची उमेदवार आणि नोटा या दोन उमेदवार समोरील मत व नाव ईव्हीएम मशीन वर प्रदर्शित न झाल्याने या दोघांना मिळालेले मत माहिती होऊ शकलेले नाही .याची शहानिशा न करता मशीनवर थेट अर्धवट प्रदर्शित झालेले निकाल घोषित करण्यात आले. या गोंधळ निर्माण करणाऱ्या घटनेने ,मतदार ,उमेदवार तसेच सर्व राजकीय पक्षांमध्ये ईव्हीएम संदर्भातील पारदर्शकता आणि विश्वासहर्ता बद्दल संशय निर्माण झालेला आहे .त्यामुळे आज दिनांक 29 डिसेंबर 2025 ला दसरा मैदान भंडारा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रभाग क्रमांक ३ प्रमाणे इतरही प्रभागात असा घोट झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्व प्रभागात सदस्य आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक नव्याने ईव्हीएम मशीन ऐवजी पूर्वीप्रमाणे बायलट पेपर वर घेण्यात यावे .या प्रकरणात जबाबदार निवडणूक अधिकारी, मॉडल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, ही भंडारा शहरवासी मतदारांची मागणी आहे. यावेळी निवेदन देताना भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर माजी आमदार चरण भाऊ वाघमारे माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, महिला आघाडी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबुद्धे, युवराज उके, वंचित बहुजन आघाडीचे डी जी रंगारी , बहुजन समाज पार्टी, आझाद समाज पार्टी, आंबेडकरवादी संघर्ष पार्टी एल वाय नंदागवळी, बहुजन रिपब्लिकन आघाडी, बहुजन मुक्ती, सोशालिस्ट पार्टी, व विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page