एकत्रीकरणासाठी 3 ऑक्टोबरला नागपूरच्या संविधान चौकात महाधरणा आंदोलनाचे आयोजन

HomeNewsचंद्रपूर

एकत्रीकरणासाठी 3 ऑक्टोबरला नागपूरच्या संविधान चौकात महाधरणा आंदोलनाचे आयोजन

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक 1 आक्टोंबर 2024 ला विश्राम भवन भंडारा येथे 1 ऑक्टोबर 1924 रोजी नागपूर येथील संविधान चौकात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनासंबंधी विस्तृत माहिती पत्रकार परिषद देण्यात आली. या संबंधात अधिक माहिती की ,आंबेडकरी समाजाला एकत्रित करण्याकरता व आंबेडकरी नेत्याला एकसंघ करण्याकरता व मताचे विभाजन टाळण्याकरता आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारे विविध घटक आहेत .त्या गटांना एकत्रित आणून आपली एक संघशक्ती निर्माण करून त्या दृष्टीने राजकीय प्रतिनिधित्व अधिक मिळण्याच्या दृष्टीने हा उद्देश ठेवून भंडारा येथून सुरू झालेली एकत्रीकरणाची चळवळ आहे ती विदर्भवादी केली आहे आणि आता भंडारा आणि नागपूरच्या दोन्ही संघटना एकत्र होऊन आता विदर्भाची समिती निर्माण झालेली आहे. आणि या विदर्भाच्या एकत्रिकरण संयुक्त रिपब्लिकन एकत्रिकरण समितीच्या माध्यमातून नागपूरच्या संविधान चौकात 3 ऑक्टोबरला महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. या महाधरण आंदोलनामध्ये भंडारा, चंद्रपूर, अकोला, गोंदिया, नागपूर, आणि वर्धा येथील समितीची संबंधित कार्यकर्ते, नेते एकत्र येऊन या रिपब्लिक चळवळीच्या नेत्यांना एकत्रित येण्याकरता बाद्य करणार आहेत. त्यामुळे सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी नागपूरला 3 ऑक्टोबरला आयोजित एकत्रीकरणाच्या महाधरना आंदोलनामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य संयोजक अमृत बनसोड, यात एकूण रिपब्लिकन समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, मुख्य निमंत्रक रोशन जांभुळकर, आसित बागडे जिल्हा महासचिव, डॉक्टर सुरेश खोब्रागडे, दिलीप वानखेडे, विजय भोवते, ज्ञानचंद जांभूळकर, प्राध्यापक रमेश जांगडे, राजेश मडामे, शिवदास गजभिये ,संजीव भांबोरे, प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, कालिदास खोब्रागडे इत्यादी नेते व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.

COMMENTS