SIR, पदवीधर नोंदणीसह पक्षसंघटन बळकटीकरणाला प्राधान्य द्या. आढावा बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना

HomeNewsनागपुर डिवीजन

SIR, पदवीधर नोंदणीसह पक्षसंघटन बळकटीकरणाला प्राधान्य द्या. आढावा बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– राजुरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती देण्यासाठी राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक राजुरा विधानसभा काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालया लगतच्या राजुरा क्लब सभागृहात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी काळातील पक्षसंघटनेची दिशा, विविध जनहिताचे प्रश्न आणि संघटनात्मक उपक्रमांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत SIR प्रक्रियेला गती देणे, पदवीधर मतदार नोंदणी प्रभावीपणे पूर्ण करणे, जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आंदोलने यशस्वी करणे आणि बूथपातळीपासून काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करणे, या विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपल्या कार्यक्षेत्रात जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच पक्षाच्या विचारधारा व जनकल्याणकारी भूमिकेचा प्रभावीपणे प्रचार करावा, अशा सूचना सुभाषभाऊ धोटे यांनी दिल्या.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, रंजन लांडे, डॉ. अंकुश गोतावळे, उपनगराध्यक्ष संजय मेंढी, सभापती संतोष इंदूरवार, हरजीतसिंग संधु, विकास देवाळकर, सचिन भोयर, गणेश गोडे, अभिजीत धोटे, तुषार बावणे, जंगू पाटील येडमे, भाऊराव चव्हाण, धनराज चिंचोलकर, अब्दुल जमीर, संतोष महाडोळे, अविनाश जेनेकर, रामभाऊ ढुमणे, प्रा. आशिष देरकर, अभय मुनोत, इर्शाद शेख, अशोक राव, कोमल फुसाटे, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, आशिष नलगे, कवडू सातपुते, सिताराम मडावी, ताजुद्दीन शेख, योगेश पट्टेवाले, साजिद शेख, उत्तम कराळे, किशोर बानकर, सय्यद साबिर, मधुकर झाडे, मुरलीधर बल्की, तिरुपती पोले, दत्ता तोगरे, विजय राठोड, रामदास पंधरे, रविंद्र कुमनकर, अमित टेकाम, आदित्य गोडे यांच्यासह राजुरा विधानसभा काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page