शासनाने 165 आश्रम शाळेला अनुदान देण्याची घोषणा केली परंतु ती हवेतच

HomeNewsनागपुर डिवीजन

शासनाने 165 आश्रम शाळेला अनुदान देण्याची घोषणा केली परंतु ती हवेतच

-सामाजिक कार्यकर्ते रोशन जांभुळकर यांचा आरोप

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) – आज आश्रम शाळेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अनुसूचित जातीच्या च्या165 आश्रम शाळा यांना   2019 ला 20 टक्के अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली परंतु आजपर्यंत ते आश्रम शाळांना देण्यात आलेले नाही.  ज्या आश्रम शाळांना २००५ वर्षाला मान्यता मिळाली या आश्रम शाळा यांना काही न करता अनुदान कंटिन्यू चालू आहे.आणि अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना अजून पर्यंत अनुदान मिळालेलं नाही हि शोकांतिका आहे . त्यामुळे कर्मचारी वर्ग एवढा निरासमय झालेला आहे की ते काम करण्यास इच्छुक नाही. कित्येक लोकांचा मरण सुद्धा झालेला आहे .संस्थापक लोक मरण्याच्या वाटेवर आहेत. ह्या गोरगरीब मुलांना आश्रम शाळेमध्ये सर्व सुविधा असल्यामुळे ते शिक्षण घेत आहेत .आणि शिक्षण घेताना जर आपण यांना अनुदान दिलं नाही तर शाळा कसे चालवावे ह्या चिंतेत संचालक वर्ग यांना प्रश्न पडलेला आहे .तरीपण शासनाने 100% अनुदान अनुसूचित जातीच्या आश्रम शाळा ला देण्यात यावे अशी मागणी संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना शासनाविषयी चिंता व्यक्त केली .

COMMENTS

You cannot copy content of this page