आदर्श शाळेत पोक्सो व बालविवाह मुक्त भारत कायद्याअंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

आदर्श शाळेत पोक्सो व बालविवाह मुक्त भारत कायद्याअंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.

– शिक्षक – विध्यार्थी व पालकांनीही जाणून घेतली माहिती.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – 1 ऑक्टोबर बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे पोक्सो कायद्याविषयी व बालविवाह मुक्त भारत अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक -विध्यार्थी व पालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून शशिकांत मोकाशे, क्षेत्रीय अधिकारी, असेस्ट टू जस्टीस फॉर चील्ड्रेन प्रकल्प राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग जिल्हा कृतीदल सदस्य यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाष्करराव येसेकर, सचिव, बा.शी.प्र. मं. यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जाभूळकर, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पालक प्रतिनिधी किशोर भोंगळे, संजय लोहबळे, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. यावेळी विध्यार्थीना प्रात्यक्षिच्या माध्यमातून चांगले व वाईट स्पर्श, भ्रमणध्वनीच्या अती वापरामुळे होणारे दुष्परिणाम, लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती , बालविवाह मुक्त भारत यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती कल्लूरवार यांनी केले. तर आभार सुनीता कोरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स, शाळेतील शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित पालकानी पोक्सो कायद्याविषयी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह प्रतिबंध व लैंगिक अत्याचार थांबाविन्यासाठी शपथ घेण्यात आली.

COMMENTS

You cannot copy content of this page