घुग्घुसवासींना कायमस्वरूपी घरपट्टे देणार

HomeNewsनागपुर डिवीजन

घुग्घुसवासींना कायमस्वरूपी घरपट्टे देणार

महसूलमंत्री बावनकुळे : घुग्घुस येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

गौतम नगरी चौफेर //घुग्घुस बातमीदाराकडून// पुढील पाच वर्षांचे घुग्घुस विकासाचे मोठे व्हिजन आपल्याला तयार करायचे आहे. ४५ लाख शेतकऱ्यांच्या शेतपंपांचे वीजबिल आपण माफ केले आहे. ३० जून २०२६ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ९३ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. लवकरच येथील पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. आपण तुकडेबंदी कायदा हटविला आहे. आता घुग्घुस येथील घरांची ड्रोन मॅपिंग केली जाणार आहे. घुग्घुसवासींना कायमस्वरुपी घरपट्टे देणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिले.

भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवार (ता. २९)

घुग्घुस येथे आयोजित सभेत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची फटाका मैदान येथे सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवरावदादा भोंगळे, सुभाषभाऊ कासनगोट्टवार, शिवकुमार यादव, अशोक जिवतोडे, रघुवीर अहीर, संजय तिवारी, प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकूर यांच्यासह अन्य जणांची उपस्थिती होती. श्री. बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीची नवी उंची गाठत आहे. आपण आजवरचे सर्वात मजबूत सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे जनहिताचे मोठे निर्णय आपण घेऊ शकत आहोत. भाजप सत्तेत असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे. घुग्घुस येथील बचत गटांना एक लाख रुपये अनुदान आपण देणार आहोत. यातून जवळपास एक हजार महिलांना स्वयंरोजगार सुरू करता येणार आहे. सूर्य घर योजनेचा लाभ घुग्घुस येथील नागरिकांना मिळणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नितीन गडकरी आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची विकासदृष्टी असलेली चारचाकांची विकासाची गाडी आपल्यापुढे उभी आहे. काँग्रेस हे बुड़ते जहाज आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. घुग्घुसच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी हे विशेष

COMMENTS

You cannot copy content of this page