वन उद्यानात औषधी वनस्पतीची लागवड.
गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) – निसर्ग हा मानवाचा गुरु आहे. निसर्गातील असंख्य वनस्पती अनेक साध्य आजारावर अत्यंत गुणकारी आहेत. प्राचीन काळातील ज्ञान हे आयुर्वेदाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचे काम पतंजली योग समितीने केलेले आहे. आधुनिक आयुर्वेदाचे शिरोमणी आचार्य बाळकृष्ण यांचे कार्य जनकल्याणकारी आहे. विज्ञानवादी बना, निसर्गाकडे चला व निरोगी रहा, असा मंत्र प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड यांनी दिला.
पतंजली योग समिती भारत स्वाभिमान संघटना किसान सेवा समिती महिला पतंजली योग समिती तहसील राजुरा जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र पूर्व यांच्या वतीने आयुर्वेद प्रमुख आचार्य बाळकृष्ण महाराज जी यांच्या वाढदिवसानिमित्त वन उद्यान येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. वनौषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले व योग व आयुर्वेद याविषयावर डॉक्टर संभाजी वरकड मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा सह संघटन मंत्री पुंडलिक ऊराडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी वरकड, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, जेष्ठ नागरिक संघटनेचे सुदर्शन दाचेवार, प्रा.हरिभाऊ डोरलीकर, डॉक्टर सपनकुमार दास आदी उपस्थित होते.

यावेळी योग आणि आयुर्वेदिक यावर मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय प्राचीन संस्कृती, वेद, उपनिषद यातील ज्ञान जगाच्या पाठीवर पोहोचविण्याचे काम स्वामी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी केलेले आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी या महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केलेले आहे. असे प्रतिपादन वनपरिक्षेत्राधिकारी श्री इंगळे यांनी केले. यावेळी वन उद्यानात वनौषधी रोपांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमात ज्यांनी मृत्यूनंतर आपले शरीर, डोळे, किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यात पुंडलिक उराडे, सौ रेखा बोडे, सौ. माधुरी पाटील, श्रीमती जीवतोडे यांचे अभिनंदन करण्यात आले. योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे योग समितीचे पदाधिकारी पुंडलिक उराडे, प्रा.हरिभाऊ डोर्लीकर, आनंद चलाख, सौ. सोनल चिडे यांना “औषधी दर्शन” मार्गदर्शन पुस्तक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर हरिभाऊ डोलकर यांनी केले. संचालन आनंद चलाख यांनी केले तर आभार तालुका प्रभारी एम.के. सेलोटे यांनी मानले. आयोजनासाठी अरुण जमदाडे, पांडुरंग नांदूरकर, सौ भावना भोयर, सौ.सुरेखा उराडे मॅडम, सौ अरुणा गावत्रे, चंद्रकला खंडाळे बाई, सौ वनिता उराडे मॅडम, शिवकरण खडाव, रमाताई आयतलवार, शिल्पा बर्डे, सौ बोढे, प्रा. सुनिता जमदाडे वनविभागाचे संजय गरमडे व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS