आंबेडकरी चळवळीतील नेते हिंदू देवदेवतांपुढे नतमस्तक होऊन बौद्ध धम्माचे अस्तित्व धोक्यात आणत आहेत.

HomeNewsनागपुर डिवीजन

आंबेडकरी चळवळीतील नेते हिंदू देवदेवतांपुढे नतमस्तक होऊन बौद्ध धम्माचे अस्तित्व धोक्यात आणत आहेत.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी गडचांदूर) – आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी मतांच्या बेरजेच्या राजकारणासाठी आपल्या फाजिल राजकीय प्रगल्भता वाढविण्याच्या नादात हिंदू देवदेवतांपुढे नतमस्तक होऊन बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देतेवेळी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाच नाही तर बौद्ध- महार, बौद्ध- चांभार, बौद्ध- मांग बौद्ध- ब्राह्मण अशा बौद्ध धम्मात नसलेल्या जाती घुसाडून बौद्ध धम्माचे हिंदूकरण करून बौद्ध धम्माचे अस्तित्व धोक्यात आणि निंदाजनक स्थितीस आणत आहेत. यासाठी बाबासाहेबांच्या स्वाभिमानी आणि निष्ठावान अनुयायी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या आणि बुद्ध धम्माच्या विचारांशी कोणत्याही विषयावर, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उत्तम रितीने पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. असे प्रतिपादन रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी स्थळ- गोवारीगुडा इथे कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे सचिनभाऊ भोयर तसेच राहुलभाऊ उमरे यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने समयोचित मार्गदर्शन केले. तथागत नवयुवक मंडळ नोकारी बु. गोवारीगुडा त. राजुरा जि. चंद्रपूर यांनी ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सम्राट अशोक विजयादशमी दिनाच्या निमित्ताने पंचशिल झेंड्याच्या पटांगणात प्रबोधनाच्या कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सौ. मनीषा ताई पेंदोर ( सरपंच ग्रामपंचायत नोकारी खुर्द ,) मुख्य वक्ते अशोककुमार उमरे आणि  प्रमुख पाहुणे म्हणुन सचिन भाऊ भोयर, नितीन भोयर, राहूल भाऊ उमरे , शैलेश चांदेकर, सुरेश कांबळे, प्रशिद रामटेके, समाधान सोनकांबळे, नितीन खैरे, महेश ससाणे, रोहित राऊत सचिन सोनटक्के इत्यादी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. मनीषा ताई पेंदोर सरपंच ग्रामपंचायत नोकारी खुर्द. यांनी समस्त गावकरी मंडळी आणि उपस्थित पाहुणे मंडळींना धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सम्राट अशोक विजयादशमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन प्रबोधन कार्यक्रमांचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन तिलक पाटील यांनी तर आभारप्रदर्शन अभिजित पाटील यांनी केले.

बालाजी चव्हाण, दिलिप भगत, संदीप राउत अभि पाटील, राजू वाकडे, बाबु केंद्रे, राजू कांबळे, विशाल कांबळे सुरद सरदार, अशोक भगत, भीमराव सुर्यवंशी, नवाब शेख, कवडू पेंदोर आकाश पवार, सुभाष तोगरे, विनोद चव्हाण, परमेश्वर केंद्रे तसेच गावातील सर्व नागरीक महिला पुरुष विद्यार्थी मंडळीने तन मन धनानी मोलाचे योगदान देऊन आणि उपस्थिती दर्शवून अतिशय निसर्ग रम्य अशा वातावरणात हा प्रबोधनाचा कार्यक्रम घडवून आणला.

COMMENTS