ओवी बेले यांनी सातव्या वाढदिवसाला केले सात झाडांचे वृक्षारोपण.

HomeNewsनागपुर डिवीजन

ओवी बेले यांनी सातव्या वाढदिवसाला केले सात झाडांचे वृक्षारोपण.

– आंबा, फणस, सीताफळ, बदाम वृक्षांची केली पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे वृक्ष लागवड.

गौतम नगरी चौफेर  बादल बेले राजुरा १२ सप्टेंबर
            बालवयात दिलेले संस्कार, शिक्षण, शिकवण ही चिरकाल लक्षात राहते. त्यामुळे बालवयात सुसंस्कार देणारी शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात सुद्धा महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. इयत्ता पहिली मध्ये शिकणारी ओवी सुवर्णा बादल बेले या विद्यार्थिनीने वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. सातवा वाढदिवस म्हणून तिने सात फळझाडांची लागवड केली. यात आंबा, सीताफळ, फणस, बदाम या वृक्षांचा समावेश आहे. याकरीता पोदार इंटरनॅशनल स्कूल, बल्लारपूर शाळेच्या प्राचार्या श्रीशा नायर, क्रीडा शिक्षक मयुर खेरकर, वर्ग शिक्षीका लक्ष्मी सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. बालवयात पर्यावरणाची आवड निर्माण होऊन भविष्यातील प्रदूषणहानी टाळता येण्याकरीता विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून या शाळेत धडे गिरवले जाते. याकरीता विद्यार्थी -पालक -शिक्षक असा समन्वय या शाळेत साधला जातो. कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून क्रीडा, शैक्षणिक, रोबोटिक, संगणकीय द्यान, सांस्कृतिक कार्यक्रम असा सर्वांगिण विकास सुद्धा साधला जात आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page