अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे लिंगनडोह येथे पाण्याची सुविधा

HomeNewsनागपुर डिवीजन

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे लिंगनडोह येथे पाण्याची सुविधा

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी  कोरपना) – गेल्या काही दिवसापासून जीवती तालुक्यातील, लिंगनडोह गांवात पाण्याची समस्या सुरु होती.
त्या गांवात नवीन बोर सुद्धा होत नव्हती. हे लक्षात घेत अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडने सीएसआर अंतर्गत आधीच असलेल्या बोरवेल मधून पाईप लाईन कनेकशन करून व 2000 लिटर च्या एकूण तीन पाण्याच्या टंकी लावून लिंगनडोह  गावाकऱ्यांच्या पाण्याची समस्या सोडवली. महिलांना पाणी भरण्यासाठी दूर अंतरावर जायची गरज पडू नये म्हणून  एकूण 6 ठिकाणी नळ सुद्धा बसवून देण्यात आलात.
पाणी भरत असताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर काही वृद्ध महिलांनी माणिकगड च्या सी एस आर पथकाला या कार्याबद्दल बोलतानी आशीर्वाद देत त्यांनी माणिकगड चे आभार सुद्धा मानले.

COMMENTS